न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२३) :- पोस्ट ऑफिसमधून बोलत असल्याचे आरोपीने भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. पोस्टाच्या डिलीव्हरीसाठी दोन रुपये पेमेंट करण्यास सांगितले. त्यासाठी आरोपीने फिर्यादीला फसवी लिंक पाठवली. फिर्यादीचे बँक तपशिल प्राप्त करुन फिर्यादीच्या बँक खात्यातून परस्पर ८०,००० रुपये रक्कम काढून घेवून फिर्यादीची आरोपीने आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि १०/०३/२०२३ पासून ते ११/०३/२०२३) दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी असताना संगणकीय साधनाद्वारे घडला. फिर्यादी रघुनाथ मंगळा शेंगाळ (रा. भोसरी) यांनी आरोपी मोबाईल क्रमांक ६३७०७२८०२३, ६००२६३७९४८ आणि ८८४७८५९०७६ याचा वापरकर्ता अमितकुमार नाव सांगणारा इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ५१५/२०२३. कलम ४०६,४२० भा.दं.वि. सह कलम ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनीयम प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.