- रस्त्याची अनधिकृतपणे खोदाई करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२३) :- पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते सम्राट चौक या दरम्यान घरोंदा हॉटेलच्या विरुध्द दिशेला रस्त्याच्या बाजुला अज्ञाताने पालिकेच्या रस्त्याच्या फुटपाथची अनधिकृत खोदाई केली. शासकीय मालमत्तेचे अंदाजे ४०,००,००० रुपयांचे आर्थिक नुकसान करुन सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केले आहे.
हा प्रकार (दि ७/०६/२०२३ रात्री ११.०० ते दि.०८/०६/२०२३ रोजी सकाळी ६.०० वा.) दरम्यान घडला. फिर्यादी निखिल रमेश फेंडर (रा. रावेत) यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६५१/२०२३ भा.द.वि. कलम ४२७, सार्वजनिक संपत्ती हानी अधिनियम १९८४ कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.