न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२३) :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनाने मुखांचे कर्करोग व इतर विकार होवुन शारीरीक हानी होऊ शकते. हे माहित असताना देखील आरोपीने प्रतिबंधीत केलेला इंपॉटेड सिगारेट (वैधानिक इशारा न लिहिलेली) व प्रतिबंधीत सुगंधी तंबाखुजन्य पदार्थ हा माल बेकायदेशिरपणे विक्रीसाठी जवळ बाळगला.
याबाबत पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ ला माहिती मिळाली. त्यांनी (दि. १९) रोजी दुपारी ३:१० च्या सुमारास गुप्ता पान भांडार, गोदावरी बिल्डींग, वाकड गावठाण या ठिकाणी कारवाई करीत आरोपीकडून एकुण ४७,१७३ रुपये किंमतीचा माल जप्त केला. वाकड पोलिसांनी ५८५/२०२३ भा.द.वि. कलम ३२८,२६९, २७०, २७२, २७३ १८८ तंबाखुजन्य जाहिरात प्रतिबंध कायदा २००३ चे कलम ७,२० प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले.
कृष्णकुमार कन्हैय्यालाल गुप्ता (वय ३४ वर्षे रा. गुप्ता पान भांडार दुकानामागे, गोदावरी बिल्डींग, मंदिराजवळ, वाकड गावठाण) असे अटक आरोपीचे नाव आहे.