न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२३) :- पिंपळे सौदागर येथे शत्रुघ्न काटे यूथ फाउंडेशनच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच करिअर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शत्रुघ्न काटे, प्रमुख पाहुणे हेमंत हरहरे, आमदार अश्विनी जगताप, गौरव त्रिपाठी, भानुदास काटे, माजी नगरसेविका निर्मला कुटे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, मोरेश्वर शेडगे, बांधकाम व्यावसायिक वसंत काटे, राजेश जाधव, प्रियांका अग्रहरी, डॉ. पंकज वाणी, शिवराज काटे, मनोज ब्राह्मणकर, सुप्रिया पाटील, शीतल पटेल, दीपक गांगुर्डे, समीर देवरे आदी उपस्थित होते.
आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, आजची ही तरुण पिढी आपल्या उद्याच्या समाजाची तसेच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन महत्त्वाचे आहे.
हेमंत हरहरे म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांनी आयुष्याची पहिली पायरी यशस्वीपणे पार केली आहे. परंतु दिल्ली अभी दूर है… आयुष्याच्या या प्रवासात एवढ्याशा यशाने हुरळून न जाता आपल्या समोर येणाऱ्या पुढच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे.
गौरव त्रिपाठी यांनी कोणतेही क्षेत्र निवडताना विद्यार्थ्यासमोरील पर्याय व आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. साधारण ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला.
उषा भारद्वाज यांनी सूत्रसंचालन केले.