न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२३) :- महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने अचानक दोन उपअभियंता व एका कनिष्ठ अभियंत्याची बदली केली आहे. एका उप अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांची तातडीने अचानक सोमवारी (दि. १९) बदली करण्यात आली आहे. उपअभियंता सुनील अहिरे यांची सेक्टर क्रमांक २३ येथून बदली करत बांधकाम परवानगी विभाग देण्यात आला आहे. तर ई क्षेत्रीय पाणीपुरवठा विभागातील राजेश जगताप आणि ग क्षेत्रीय कार्यालयातील सुरेश लंगोटे यांचीही बांधकाम परवानगी विभागात बदली करण्यात आली आहे. या तिघांची बांधकाम परवानगी विभागात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, स्थापत्य विभागास नव्याने ११ कार्यकारी अभियंता मिळालेले असताना ई क्षेत्रीय कार्यालयात उपअभियंत्या देवेंद्र बोरावके यांच्याकडे कार्यकारी अभियंत्याचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. या अचानक झालेल्या पदभाराबाबत शंका उपस्थित केली जात आहे.















