न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२३) :- सेलिब्रिना इंस्टाग्रामवर लाईक व फाँलो करायचे पार्ट टाईम काम आहे, असा आरोपी महिलेने फिर्यादीला मोबाईल वरून फोन केला. दरम्यान टेलिग्रामवर अगोदर काही टाक्स पुर्ण केल्यानंतर त्याचा काही आर्थिक मोबदला दिला. विश्वास संपादन करून प्रिपेड टाक्स पुर्ण केल्यास अधिक पैसे मिळण्याचे आमिष दाखवले.
प्रिपेड टाक्स टाक्स पुर्ण करताना चुक झाल्याने व्हीआयपी अपग्रेशनसाठी तसेच टॅक्ससाठी एकुण ६,९३,५०० (सहा लाख त्र्यान्नव हजार पाचशे रूपये) इतकी रक्कम फिर्यादीला आरोपीच्या विविध खाती व युपीआय आयडीवर आँनलाईन भरायला भाग पाडले. त्यानंतर कोणीतरी रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. १८/०४/२०२३ ते दि २२/०४/२०२३) दरम्यान फिर्यादीच्या राहत्या पत्यावर ज्योतीबानगर, काळेवाडी येथे घडला. फिर्यादी रवी विक्रम खुणे यांनी आरोपी मो क्रं ९६३१००८०७७ यावरील स्मार्ट साईट्स कंपनीतील मँनेजर, महीला आदिती (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी आरोपींवर ६२५ / २०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४१९ माहीती तंत्रज्ञान कायदा सन २००८ चे कलम ६६ (सी) (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















