- रावेत पोलीस स्टेशनमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२३) :- पोलिसांच्या बीट मार्शल (बी.एम.- १) एम.डी मशिनवर कॉलरने कॉल केला. जय गणेश लॉनजवळ नवरा बायको दारु पिऊन आप-आपसात भांडण करत आहेत व त्याचा लोकांना त्रास होत आहे. तसेच शिवीगाळ करत आहेत. लवकर पोलीस मदत हवी आहे, असा डायल ११२ वर कॉल प्राप्त झाला.
फिर्यादी व डायल ११२ वरील पोलीस अंमलदार हे कॉल पॉईन्टवर गेले. आरोपीत महिला यांना पोलिसांनी रावेत पोलीस स्टेशन येथे आणले. आरोपी हे पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरडा करुन फिर्यादी महिला पोलिसाला आर्वाच्च भाषेत बोलू लागले. फिर्यादी यांनी महिला आरोपीस समजावून सांगितले. मात्र, महिला आरोपीने फिर्यादीची कॉलर धरुन त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाच्या बाजुला दाताने चावा घेवून फिर्यादीच्या हाताला गंभीर दुखापत केली.
तसेच कायदेशीरपणे कर्तव्य बजावत असताना आरोपीने अडथळा आणला, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. २) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास, रावेत पोलीस स्टेशनमध्ये रावेत येथे घडली. रावेत पोलीस स्टेशनच्या फिर्यादी महिला पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात २४८/२०२३ भादवि कलम ३५३, ३३३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.














