न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२३) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौणिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. दिपक शहा यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. शहा यांनी पुरातन काळापासून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले पण या सगळ्यात शिक्षकांचे स्थान आजही परमोच्च राहिले आहे.
उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे व सर्व विभागाच्या समन्वयिका यांनी सरस्वती पूजन केले. यानिमित्ताने ‘एक शिक्षक एक झाड’ या उपक्रमाची माहिती प्रा.अर्चना गांगड, प्रा. रघुनाथ ताम्हाणे व प्रा. विजया चौधरी यांनी दिली.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वर्षा निगडे आणि प्रा. तृप्ती बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.












