न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२३) :- घरा समोर जावुन पाण्याचे आडवे कनेक्शन का घेतले? अशी फिर्यादी यांनी आरोपीला विचारणा केली. फिर्यादीने सरकारी काम करु नये, या उद्देशाने आरोपी फिर्यादीला ‘तुझ्या बापाची पाईप लाईन आहे का’ असे म्हणुन त्यांची गचुंडी धरून कानाखाली मारली. तु पुन्हा येथे दिसला तर तुला मारील, असे म्हणाला.
त्यावेळी आरोपीच्या भावाने प्लास्टीक पाईप उचलुन फिर्यादीच्या पाठीत मारला. फिर्यादी हे सरकारी कर्मचारी आहेत हे माहीत असुन सुध्दा त्यांनी फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. हा प्रकार (दि. १३)रोजी सकाळी ९.१५ वाजता दत्तवाडी, ता मावळ जि पुणे येथे घडला.
फिर्यादी ज्ञानेश्वर किसन तिडके (ग्रामपंचायत शिपाई) यांनी आरोपी शंकर तुकाराम सुतार (रा. आडे ता. मावळ जि. पुणे), गणेश तुकाराम सुतार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलिसांनी १८५/२०२३ भादवि कलम ३५३,५०६, ३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.














