न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२३) :- ‘गर्लफ्रेंडला का बोललास’ या कारणावरुन फिर्यादीच्या कानावर, नडगीवर मारुन त्याचे कपडे फाडले. फिर्यादीचे आई-वडील व भाऊ हे भांडणे सोडवण्यास गेले. आरोपी यांनी त्यांनाही मारहाण केली. फिर्यादी त्यांच्या कुंटुबासह घरी जात असताना आरापीने फिर्यादीच्या आईला घाणघाण शिवीगाळ केली. आरोपीने पाठीमागुन येवुन फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागील बाजुस जबर मारहाण करुन फिर्यादीला जखमी केले. आरोपी यांनी तुम्ही पोलीसांना सांगितले तर याद राखा अशी दमदाटी करून शिव्या देत निघन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १३) रोजी ९.०० वाजता गुळवेवस्ती, पांडुरंग कॉम्प्लेक्स जवळ, भोसरी येथे फिर्यादीच्या घरासमोर घडला.
फिर्यादी रोशन शैलेश सिंग यांनी आरोपी रमेश शिवाजी लोखंडे (रा. सर्वे नं. १५/१, पांडुरंग कॉम्पलेक्स जवळ, गुळवेवस्ती भोसरी), सुरज शिवाजी लोखंडे (वय २६ वर्षे रा. सर्वे नं. १५/१. पांडुरंग कॉम्पलेक्स जवळ, गुळवेवस्ती भोसरीगाव), अमित शंकर राठोड (वय २४ वर्षे धंदा रा. इंदिरानगर राकेश स्वीट होम वरती फ्लॅट नं.०२ इंदिरानगर, भोसरीगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपीच्य विरोधात ५७९/२०२३ भादवी कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.














