न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२३) :- दुकानात येवुन कामगारांना बाहेर काढले. हॉकी स्टिक तसेच हातोड्याने दुकानातील सामानाची तोडफोड केली. तसेच खंडणीच्या स्वरुपात दुकानातील सामान देण्यासाठी फिर्यादीस मारुन टाकण्याची धमकी देवून आरोपींनी शिवीगाळ केली.
हा प्रकार (दि. १३) रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ‘लाईट हाऊस’ नावाचे दुकान, भवाणी बॅग्स दुकानासमोर, रिव्हर रोड, पिंपरी येथे घडला. फिर्यादी विकास भगवानदास माणिक यांनी आरोपी आयुष्य कलेश्वर सरोदे (रा. रमाबाई नगर पिंपरी), कुणाल (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ७३४ / २०२३ भा.दं.वि.सं. कलम ३८७, ५०४, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.














