न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०२३) :- बेकायदेशीर गर्दी आणि जमाव जमवुन आरोपी हे फिर्यादीच्या मंगलम लाईफ पार्कच्या साईटच्या सेल्स ऑफीसमध्ये आले. आरोपी यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत त्यांच्या परवानगी शिवाय साईट ऑफीस बांधले आहे, असा मनात गैरसमज करून घेवुन सर्व कामगारांना गलिच्छ शिवीगाळ, दमदाटी केली.
माझ्या जागेत मला न विचारता मंगलम लाईफ पार्क साईटचे सेल्स ऑफीस कसे काय बांधले आहे, सदर साईटचे ऑफीस आम्ही जेसीबीच्या साहायाने पाडुन टाकणार आहे, आम्हाला कोण आडवतात ते बघतो, असे म्हणुन सेल्स ऑफीसमधील रिसेप्शन एरियामध्ये ठेवलेल्या सात लाख रुपयांचा काचेचा प्रॉजेक्ट व इतर रिसेप्शन एरियामधील वस्तुची तोडफोड करून नुकसान केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. १३) रोजी दुपारी ३.०५ च्या सुमारास डुडुळगाव येथे घडली. फिर्यादी अजित सुरेश पाटील यांनी आरोपी महिला आरोपी, विराट उर्फ मंथन किशोर भिल्लारे (दोघे रा. पिंपळे निलख), इतर अनोळखी ८ ते १० मुले (वय अंदाजे २० वर्षे ते २५ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी ३०२/२०२३ भादवि कलम १४३, १४७, १४९,४२७, ५०४, ५०६ सह मु पो अॅक्ट कलम ३७ (१) ३ सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














