न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- पुर्वी असलेल्या प्रेमसंबंधातुन आरोपीने आयटी परिसरात कामास जाणाऱ्या फिर्यादी तरुणीचा वारंवार पाठलाग केला. फिर्यादीशी भांडणे करुन शिविगाळ व दमदाटी केली. फिर्यादी राहत्या घरून पायी कंपनीत कामावर जात असताना आरोपीने पुन्हा फिर्यादीचा पायी पाठलाग केला. रस्ता आडवून प्रेमसंबंध ठेवण्यासाठी भांडणे अनं शिविगाळ करुन दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १८) रोजी सकाळी ०६.०० च्या सुमारास विप्रो सर्कल, हिंजवडी येथे घडली. महीला फिर्यादीने आरोपी अनिकेत माधव फुस्कटे (वय २२ वर्षे रा. मुकाईनगर, हिंजवडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ८०४/२०२३. भा.दं.वि कलम ३५४(४), १४१,५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करीत तरुणाला अटक केली आहे.












