न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- एमआयडीसी भोसरीतील मरक्युरस वॉटर ट्रिटमेंट या कंपनीच्या बाथरुमच्या भिंतीवरुन उडी मारुन कंपनीतील प्रॉडक्शन व स्टोअर विभागातील १,७४,००० रुपये किंमतीचे एसएस पाईप व फ्लेक्झीबल केबल चार अज्ञात आरोपींनी चोरुन नेले आहेत.
हा प्रकार (दि. १६) रोजी रात्री ३.०० च्या सुमारास घडला. फिर्यादी अवधुत पांडुरंग खोत यांनी अज्ञात चौघा आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ३०५/२०२३ भादवि कलम ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.












