न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- टाटा कंपनीची बस आरोपी चालकाने भरधाव वेगात, निष्काळजीपणे व हयगयीने चालवली. फिर्यादी यांच्या वडीलांच्या टु व्हीलरला पाठीमागुन धडक दिली. त्यामुळे फिर्यादी यांचे वडील गाडीसह खाली पडले. त्यावेळी बस चालकाने त्यांच्या अंगावर बस घालुन त्यांना गंभीर जखमी केले. अपघाताची माहिती पोलीसांना न कळविता तसेच फिर्यादी यांचं वडीलांना दवाखान्यात न नेता तो पळुन गेला. अपघातात फिर्यादी यांचे वडील हे मयत झाले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १७) रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास अंकुशराव लांडगे नाट्यसभागृहा समोर, पुणे नाशिक हायवे, भोसरी येथे घडली. उमाकांत अशोक वारके यांनी आरोपी टाटा कंपनीची बस एमएच०६एस७०४३ वरील चालकच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ५९४/२०२३ भा.द.वि कलम २७९, ३०४(अ), मोटर वाहन अधिनियम कलम ११९/१७७, १३४ (ब) प्रमाणे आरोपी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.












