- एमएसईबीची परवानगी न घेताच केले काम; दोघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- जमिनीखालुन गेलेल्या विद्युतवाहीनीबाबत आरोपींनी फिर्यादीला आणि त्यांच्या भाच्याला कोणतीही माहीती दिली नाही. एम.एस.ई.बी.च्या कार्यालयाची परवानगी न घेता आरोपी यांनी संगणमताने निष्काळजीपणाने त्यांना काम करण्यास लावले. फिर्यादी यांचा मयत भाचा गोपाळ बालाप्पा अय्याळी (वय २१ वर्षे, नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर, चिंचवड) याच्या मृत्युस आरोपी कारणीभुत झाले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. १७) रोजी दुपारी ४:०० च्या सुमारास कोयते वस्ती चौक, पुनावळे येतेह घडली.
फिर्यादी रवी कोटरप्पा बजलवार यांनी आरोपी वाघेरे (वय ५० अंदाजे, संपूर्ण नाव पत्ता माहीत नाही), सिध्देश सहदेव तांडेल (वय २७, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी आरोपींच्या विरोधात २६४ / २०२३ भा.द.वि कलम ३०४ (अ), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















