न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- १६ वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीचे तीच्या आई वडीलांनी लग्न लावुन दिले. तीच्या इच्छेविरुध्द तीच्या पतीने तीच्याशी जवळीक साधुन तीच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने अल्पवयीन असतानाच तिला गर्भधारणा झाली आहे.
हा प्रकार (दि. १४/०७/२०२२ ते दि. ११/०७/२०२३) दरम्यान पिडीतेचे सासर येथील घर आणि पिडीतेचे माहेर येथील घरी घडला. महिला फिर्यादीने आरोपी महिला, वडील राजू ठाकुर, आरोपी महिला, सासरे बापू शिंदे, पती गणेश शिंदे व इतर नातेवाईक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ७५९ / २०२३ भा.दं.वि. ३७६ (२) (एन), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१७ बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००७ चे कलम ९.१०.११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















