- तरुणाचा जागीच मृत्यू; वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- टीव्हीएस स्कुटीवरुन कंपनीमध्ये फिर्यादीचा चुलत भाऊ कामासाठी जात होता. सकाळी अकराच्या सुमारास पाठीमागुन आलेल्या कच-याच्या डंपरवरील अज्ञात चालकाने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करीत वाहन हयगयीने, अविचाराने भरधाव वेगाने चालवले. फिर्यादी यांच्या चुलत भावाच्या स्कुटीला उजव्या बाजुने धडक देऊन अपघात केला. अपघातात किरकोळ व गंभीर दुखापती होऊन त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. संकेत गणेशराव वानखडे याच्या मुत्युस कारणीभुत होऊन टीव्हीएस अॅन्टारचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा अपघात (दि. १९) सकाळी अकराच्या सुमारास राजीव गांधी बिन चेक पोस्ट जवळ, वळनावर, जुनी सांगवी येथे घडला. फिर्यादी डॉ अक्षय भिमराव वानखडे यांनी आरोपी कच-याचा डंपर (एमएच१२एसएक्स ३८४६) यावरिल अज्ञात चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ३३६/२०२३, भा.दं.वि. कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ अ, ४२७ मो.व्ही. अॅक्ट १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


















