न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२३) :- भोसरी स्मशानभुमी समोरील मोकळ्या मैदानात सराईत गुन्हेगार महेश उर्फ अभि विनायक जाधव (वय २५ वर्षे, रा. प्रतिक हॉटेल मागे, धावडे वस्ती, भोसरी) हा त्याच्या कमरेस पिस्टल लावून येणार आहे, अशी माहिती पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाला मिळाली.
पोलिसांनी परिसरामध्ये सापळा लावला. दरम्यान पोलीस त्याच्या मागावर असल्याची चाहुल लागताच आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरोडा विरोधी पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडुन १,००,००० रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल, १,००० रुपये किमतीचे एक जिवंत पितळी काडतूस (राउण्ड) जप्त करण्यात आले आहे.
आरोपीविरुध्द भोसरी पोलीस स्टेशनमध्ये रजि नं ५९६ / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याआधी भोसरी पोलीस स्टेशन येथे पूर्वी जबर दुखापतीचा एक गुन्हा नोंद आहे.
ही कामगिरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा – १ यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार, उमेश पुलगम, विनोद वीर, गणेश सावंत, सुमित देवकर, आशिष बनकर, गणेश हिंगे. सागर शेडगे व राजेश कौशल्य सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केली आहे.















