न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- बसची वाट पाहात थांबले असता आरोपींनी फिर्यादीच्या हातातील १०,००० रूपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅसक्सी एम ३१ मॉडल हा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला.
हा प्रकार (दि. २०) रोजी सकाळी ८.०० च्या सुमारास आर. के. कॉर्नर, साईनगर, देहुरोड येथे घडला. फिर्यादी शिवम चिनकाऊ गौतम यांनी आरोपी नागेश बाळू भंडारी (वय २० वर्षे रा. वाकड), महीला आरोपी (वय २२ वर्षे रा. वाकड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी ३७५ / २०२३ भा.द.वि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीना ताब्यात घेतले. विधी संघर्षित २ बालकांना समजपत्र देवुन आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.















