न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी केली. ओळखपत्र दाखवुन फिर्यादीच्या मेडीकलमधुन दिलेल्या औषधामुळे पेशंट मरणार आहे. त्याचा गुन्हा दाखल होवून अटक होणार आहे, अशी त्यांना भिती घालून, ब्लॅकमेल केले. धमकी देवून वेळोवेळी रोख रक्कम ५,५८,००० रूपये देण्यास भाग पाडून खंडणी घेतली आहे. तसेच इतर मेडीकल दुकानदार यांनाही सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होवून अटक होणार आहे, अशी भिती घालून त्यांचीही फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०८/१२/२०२२ ते दि. २५/१२/२०२२) दरम्यान भगवती मेडीकल, आनंदनगर, चिंचवड, व लक्ष्मी मेडिकल, मोशी येथे घडला. फिर्यादी मांगीलाल घिसाराम चौधरी यांनी आरोपी सुरेश जसाराम चौधरी (वय ३२ वर्षे रा. संत तुकारामनगर, पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी ३१३ / २०२३ भादवि कलम ३८४, ३८८, ३८९, १७०, १७१, प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.















