न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- मसाला दुध कॉर्नरच्या दुध ठेल्यावर येवुन आरोपीने फिर्यादीला फुकट मसाला दुध आणि क्रिमरोल मागितले. त्यास फिर्यादीने स्पष्ट नकार दिल्याने, त्याचा राग मनात धरून आरोपीने लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या ठेल्यावर जोरजोरात मारुन फिर्यादीला मोठया आवाजात शिव्या दिल्या. फिर्यादीच्या ठेल्याच्या काऊंटरवरील सामानाची तोडफोड करुन फिर्यादीला आणि फिर्यादीच्या ठेल्यावरील ग्राहकांना घाबरवुन, दहशत माजवुन फिर्यादीकडे दर महिना ५००० रु. चा हप्ता मागितला. तसेच फिर्यादीला शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी देवून त्रास दिला आहे.
ही घटना (दि. १५) रोजी रात्री १०.३० ते १०.४५ च्या सुमारास देहुफाटा, आळंदी देवाची, ता.हवेली जि. पुणे येथे घडली. फिर्यादी पृथ्वीराज शिवाजी पारधे यांनी आरोपी अनिकेत मेटकर उर्फ गुड्या (रा. दिघी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी ३१७/२०२३ भादवि कलम ३८५, ३८७, ४२७ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ७ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.


















