न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- दुचाकी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन त्याची दुचाकी फिर्यादी चालवित असलेल्या टेम्पोला पाठीमागील डाव्या बाजुस धडकवली. दुचाकीस्वार गाडीसह डांबरी रस्त्यावर पडुन डोक्यास गंभीर मार लागून स्वत:च्या मृत्युस कारणीभूत झाला आहे.
हा अपघात (दि. १९) रोजी दुपारी ४.३० वाजता जय भारत चौकाच्या अलीकडे, देहु रस्ता, मोशी येथे घडला. फिर्यादी गजानन त्र्यंबक दराडे यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसात मयताच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी ३०६ / २०२३ भादवि कलम २७९,३०४ (अ), सह मो.वा.का कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शान ए आलम वखार अहमद शेख (वय २१ वर्षे लक्ष्मी चौक, मोशी) असे मयताचे नाव आहे.















