- गुंतवणुकीतून अमाप पैसे कमविण्याच्या नादात होतोय खिसा रिकामा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- टेलीग्रॅम ग्रुपमध्ये लिंकवरील टास्क पुर्ण करण्यास सांगुन एकुण गुंतवणुकीच्या ३० ते ४० टक्के प्रमाणे कमिशन देतो, असे आरोपीने फिर्यादीला आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करुन आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविण्यास सांगिले. आरोपींनी फिर्यादीची एकूण १२,५७,००० रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २२/०६/२०२३) रोजी दुपारी २.०० ते आजपावेतो हिंजवडी व बाणेर येथे घडला. फिर्यादी सुदर्शन लक्ष्मण सानप यांनी आरोपी युपीआय आयडी क्रमांक vidyavds82-2@okaxis, फेडरल बँकेत खाते क्रमांक १८६४०१०००७५४५९, पंजाब नॅशनल बँक खाते क्रमांक २१०३१०२१०००००७३६, पंजाब नॅशनल बँके खाते क्रमांक १३५४१०२१०००००२६३, आयसीआयसीआय बँकेचे खाते क्रमांक १०६१०५०२०८३६, एचडीएफसी बँक खाते क्रमांक ५०१००५९५४३१९०० वरील खातेदारांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ८१२/२०२३ भादवि कलम ४०६, ४२० प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.















