न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- आकुर्डी येथे बांधकाम ठेकेदाराच्या ४०,००० रूपये किमतीच्या ४० लोखंडी सेंट्रींग प्लेटा आरोपीने चोरून नेल्या होत्या. हा प्रकार (दि. २०) रोजी ९.०० च्या सुमारास क्रांतीनगर येथे घडला.
फिर्यादी अभिजीत बबन आव्हाड यांनी आरोपी नितीन प्रकाश मोटे (वय ३६ वर्षे रा. काळेवाडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ४२८/२०२३ भा. द. वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.















