न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२३) :- रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाझुडपात अंदाजे एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळले आहे. त्याच्या आई-बापाने अथवा ज्याच्याकडे त्याची देखभाल आहे त्या व्यक्तीने त्या अर्भकाचा संपुर्णतः परित्याग करण्याच्या उद्देशाने त्याला उघडयावर टाकून दिले आहे.
हा प्रकार (दि. २०) रोजी ३.०० वाजताच्या सुमारास क्रिएटिव्ह एंटरप्रायजेस कंपणीच्या जवळ, ओंकार किराणा दुकानाच्या समोर निदर्शनास आला. आळंदी पोलिसांनी १८४/२०२३ भादवि कलम ३१७ नुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.















