- आर्थिक व्यवहारातून रचला अपहरणाचा कट; शिरगाव पोलिसांकडून गुन्हेगार अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- नादुरुस्त असणारी लाल रंगाची स्कुटी दुरुस्तीसाठी फिर्यादीचे पती सोसायटी जवळील गॅरेजमध्ये जात होते. त्या दरम्यान अज्ञात इसमांनी पैशांच्या व्यवहारातुन फिर्यादीच्या पतीचे अपहरण केले.
ही घटना (दि. २०) रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास शिरगांव ता. मावळ जि. पुणे येथे घडली. महिला फिर्यादी यांनी निष्पन्न आरोपी सचिन प्रतापराव नलवडे (वय ३६, रा.शिराळा ता.शिराळा जि.सांगली), प्रताप संपत सावंत (वय ४२ वर्षे रा. काळमवाडी ता. वाळवा जि. सांगली), उमेश वसंत सावंत (वय ३४ वर्षे रा. काळमवाडी ता. वाळवा जि.सांगली), राकेश सुधाकर गवंडी (वय २८ वर्षे रा. काळमवाडी ता. वाळवा जि.सांगली), रोहित सर्जेराव पाटील (वय. २९ वर्षे रा. येलूर ता. वाळवा जि.सांगली), पोपट महादेव शिंदे (वय ३३ वर्षे रा. पाडळी ता.शिराळा जि.सांगली), मनोज महादेव पाटील (वय २८ वर्षे, रा. मागले ता.शिराळा जि.सांगली), अक्षय मोहन गायकवाड (वय २७ वर्षे रा. येलर ता. मावळ जि. पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
शिरगाव पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात १९५/२०२३ भां.द.वि. कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पो.उप. नि. गाडीलकर हे करीत आहेत.












