- चिंचवडमधील घटना; अज्ञातांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- कामाचा पगार घेऊन फिर्यादी पायी चालत जात होते. त्या दरम्यान दोन अज्ञात इसम त्यांच्या मोपेडवर घटनास्थळी आले. ‘तुम्ही माझे पडलेले आयकार्ड घेतले आहे’ असे म्हणत आयकार्ड शोधण्याकरता फिर्यादीची सॅक चेक करण्याचा बहाणा केला. सॅकमध्ये ठेवलेले रोख २५००० रुपये हातामध्ये घेवुन फिर्यादी हे त्यांची सॅक आरोपींना दाखवत असताना यातील आरोपी यांनी फिर्यादीला ‘पैसे रुमालात बांधुन ठेवा, असे हातात पकडु नका’ असे सांगितले.
दरम्यान फिर्यादी पैसे रुमालात बांधुन ठेवत असतानाच फिर्यादीला मदत करण्याचा बहाणा करीत त्यांचा विश्वास संपादन करुन आरोपींनी हातचलाखीने फिर्यादीच्या रुमालात पांढ-या कागदांचा बंडल बांधुन आरोपी पैसे घेवुन गेले. हा फसवणुकीचा प्रकार (दि. २०) रोजी दुपारी १.०० वाजेच्या सुमारास किसन रेसीडेन्सी व क्वीन्स टाउन चिंचवड समोरील मोकळ्या जागेत सार्वजिक रोडवर घडला.
फिर्यादी अकबर अली मोहम्मद इस्लाम (चिंचवड) यांनी मोपेड मोटार सायकल वरील दोन अनोळखी इसम (वय अंदाजे ३० ते ४०, नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी ३१६/२०२३ भा. दं.वि कलम ४२०,३४ नुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोउपनि व्हरकाटे हे करीत आहेत.












