न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- बॉश कंपनीच्या वापरासाठी असणारा २,४५,००० रुपये किंमतीचा KOEL GREEN कंपनीचा ४० केव्हिए जनरेटर आरोपी कामगारांनी चोरून नेला आहे. चोरीचा हा प्रकार फेब्रुवारी २०२३ ते दि. १९/०७/२०२३ च्या दरम्यान महाळुंगे गावच्या हद्दीतील बॉश कंपनीचे वेअर हाऊस, हार्मन कंपनीच्या पाठीमागे, इंडोस्पेस पार्क, ता. खेड जि. पुणे येथे घडला.
फिर्यादी धीरजकुमार यदुनंदन सिंग हे महिंद्रा लॉजिस्टिक, रिजनल ऑफिस होरीजन पार्क, ता खेड जि पुणे येथे वेअर हाऊस मॅनेजमेन्ट, मॅनपॉवर व इतर अडचणी पाहण्याचे काम करतात. त्यांनी अभिमन्यु अनिरुध्द बढ़े (वय ३९ वर्षे, रा. तळेगाव दाभाडे), संदिप सोपान साळवे (वय ३७ वर्षे, रा. तळेगाव दाभाडे) या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध ४१७ / २०२३ भा.दं.वि कलम ३८१,३४ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोहवा बिराजदार हे करीत आहेत.












