- चौघा जणांकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- सीएनजी पंपावर लागलेल्या रिक्षाच्या लाईनमधे घुसुन आरोपींनी फिर्यादीला व इतर रिक्षा चालकांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. फिर्यादीला हाताने व लाथाबुक्यानी जबर मारहाण केली.
तसेच तेथील लोखंडी बॅरीगेट फिर्यादीच्या डोक्यात व पाठीत मारले. पोटात मोठी दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २०) रोजी रात्री ८.३० च्या सुमारास सीएनजी पंप, दुर्गानगर, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी श्रीकांत लालासाहेब जोगदंड (थरमॅक्स चौक, चिंचवड) यांनी रिक्षामधील चार अनोळखी इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस ठाण्यात ४२९/२०२३ भा.द.वि. कलम ३०८, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोउपनि ताकतोडे हे करीत आहेत.












