- आरोपींकडून ‘आम्ही कॉलेजचे ट्रस्टी आहोत’ असा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- श्री बालाजी युनिव्हर्सिटीमध्ये कोणताही संबंध नसताना कॉलेजच्या परवानगीशिवाय आरोपी पाच जण बेकायदेशीरपणे शिरले. कॉलेजमध्ये घुसुन ‘आम्ही कॉलेजचे ट्रस्टी आहोत’, असे खोटे सांगितले.
विदयापीठातील श्री. बालाजी विद्यापिठाचे संस्थापक कुलपती कै. बालासुब्रमण्यन यांच्या ऑफिसचे बंद असलेले दार तेथील गार्ड यांना धक्काबुक्की करुन बनावट चावीने उघडुन जबरदस्ती आतमध्ये प्रवेश केला. ही घटना (दि. २०) रोजी दुपारी ४.१० च्या ‘दरम्यान श्री. बालाजी विद्यापीठ, ताथवडे येथे घडली.
फिर्यादी डॉ. शिवचंद्र बसप्पा आगासे (रा. वाकड) यांनी आरोपी परंधामन, चेंदुर्वधिनी, जयबालन, शितकल, सुधाकर (पुर्ण नाव पत्ते माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस ठाण्यात पोलिसांनी ६९७ / २०२३ भा.द.वि कलम १४३, १४७, ४५२, ३२३ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोउपनि गिरनार हे करीत आहेत.












