- दोघांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- कॅनरा बँकेने जिल्हाधिकारी यांच्या हुकुमावरुन फ्लॅट जप्त केला. त्यावर नायब तहसिलदार यांनी लॉक करुन सिल केले, असे असताना तसेच दरवाजावर प्रॉपर्टी जप्त झाल्याबाबतची नोटीस लावलेली असताना दोघांनी कॅनरा बँकेच्या ताब्यात असलेल्या फ्लॅटमध्ये गृहअतिक्रमण केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २१) रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास दिगंबर क्लासिक अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. १०२, पवारनगर, जुनी सांगवी येथे घडली. फिर्यादी सौरभ कुमार चंद्रसेन सिंग यांनी महिला आरोपी, ओम धारेश भावसार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी ३४१/२०२३ भा.दं.वि कलम ४४८ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि जाधव हे पाहत आहेत.












