न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२३) :- वाकड परिसरात दहशत माजविणा-या अट्टल गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांनी एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. अट्टल गुन्हेगार राहुल विलास चव्हाण (रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी राहुल हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह वाकड पोलीस स्टेशन, हिंजवडी पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयतासारख्या जीवघेणी हत्यारांसह, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी मागणे, दुखापत, गंभीर दुखापत, अपहरण करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, चोरी करणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, चोरी, खंडणीसाठी तोडफोड करुन दहशत निर्माण करणे व बेकायदेशीरपणे घातक हत्यार जवळ बाळगणे, तसेच बेकायदेशीरपणे जमाव जमवुन दुखापत करणे व तोडफोड करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
या सराईत गुन्हेगारावर एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी इसमा विरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृह, येरवडा येथे (दि. २१) स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.
ही कामगीरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), बाबासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे-१), पिपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, वाकड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, (पी.सी.बी. गुन्हे शाखा), पोलीस हवालदार, सचिन चव्हाण, पो.ना. कारभारी (पी.सी. बी. गुन्हे शाखा), स.पो.फौ. पाटोळे, वाकड पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड यांनी केली आहे..
एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्धतेच्या एकूण ४ कारवाई करण्यात आलेल्या आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.












