न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२३) :- शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक प्राथमिक विद्यामंदिर, काळेवाडी या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. सरकारच्या “माझी माती, माझा देश” मोहिमेमुळे या सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणाच्या भव्यतेत भर पडली आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. यावर्षी स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत संस्थेचे सचिव श्री मल्हारीशेठ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहन कार्यक्रम साजरा करण्यात आला. सकाळी ८:३० वाजता विधितज्ञ श्री अभिमन्यु मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी श्री राजाराम तापकीर, उद्योजक बापू देखमुख, दंतरोग तज्ञ राजू कुंभार, प्रियल कुंभार, पुणे जिल्हा केमिस्ट असोशिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विवेक तापकीर,श्री चंद्रकांत तापकीर,शशिकांत तापकीर, नवनाथ तापकीर, मनोज शिंदे, इ मान्यवर उपस्थित होते.
इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी लेझीम, झेंडा, घुंगुरकाठी, डम्बेल्स व रिंग सारख्या विविध प्रकारच्या कवायती सादर केल्या. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर पिरामिड, अम्ब्रेला व पॉम पॉम ड्रील, अशा प्रकारचे नृत्य व कसरती सादर केले. सार्थक हांडे, रुची महाडीक,दुर्वा गोरगेल, आयुश कांबळे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. सुप्रिया खताळ, प्रिती कांबळे, समिक्षा बिरादार, समिक्षा मेसरे, वैष्णवी दहिभाते, हर्षदा पुंड, अमृता मनाळे, भारती पठाडे यांनी गायन केले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पवार यांच्या अधिपत्याखाली, रवींद्र बामगुडे,संतोष पानसरे, पूनम कांबळे इतर शिक्षक/शिक्षकेतर यांनी केले. रेश्मा स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. तर उल्का जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.















