न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. १५ ऑगस्ट २०२३) :- वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांना चाप बसवण्यासाठी व परिसरातील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळावे यासाठी खेड तालुक्यातील वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोन मधील भांबोली व वासुली फाटा हे व्यापारी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. या ठिकाणी बाजारपेठ असल्याने नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच व्यापार मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याच प्रमाणात गुन्हेगारी देखील वाढली आहे.
या भागातील गावांमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत महाळुंगे इंगळे या ठिकाणी नविन पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहे. वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
चाकण एमआयडीसीसह परिसरातील गावांमध्ये सामाजिक शांतता, सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी महाळूंगे पोलीस स्टेशन अंकित वासुली फाटा येथे नविन पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. – वसंत बाबर – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महाळूंगे पोलीस ठाणे…














