न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी नेक्सा कंपनीच्या (एक्सएल६एमएच१३वीएल७१२०) गाडीवरील चालकाने कार भरघाव वेगाने व रोडच्या रहदारीकडे दुलर्क्ष करुन निष्काळजीपणाने चालवली. रस्त्याच्या उजव्या बाजुने कंटेनरला ओव्हरटेक करुन पुढे जात असताना एका अज्ञात पादचा-याला पाठीमागुन जोराचा धक्का दिला. त्यात तो इसम गंभीर जखमी होवुन बेशुध्द झाला. त्याला औषधोपचारकामी वाय.सी.एम. हॉस्पीटल, पिंपरी येथे नेले असता डॉक्टर तपासणीपुर्वी तो इसम मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले आहे. या घटनेस कार चालक हा कारणीभुत झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १६) रोजी ०१.३० वा ०२.०० वा. च्या दरम्यान पुणे-मुंबई बँगलोर हायवे रोडवर, ग्राम दैवत श्री धर्मनाथ महाराज उडडाण पुलावर, रावेत येथे रोडच्या मध्यभागी डिव्हायडर लगत घडली.
आरोपी गणपती शिवाजी पाटील याच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात ३१४/२०२३ भा.द.वि कलम २७९, ३०४ (अ) सह मो. वा. का. कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. पोउपनि पन्हाळे पुढील तपास करीत आहेत.















