न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- जेबीसी कॅपीटल व जेबीसी अॅग्रोटेक या कंपनीत गुंतवणुकीचे व परताव्याचे आमिष आरोपीने फिर्यादीला दाखवले. फिर्यादीकडुन एकुण ५०,००,००० रुपये रक्कम चेकव्दारे घेतले. त्या बदल्यात एकुण २,००,००,००० रुपये परतावा देतो, असा करारनामा करुन त्या आधारे आमिष दाखवून ते परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ३.०३.२०२० ते दि. १५.०४.२०२१) दरम्यान वाकडमध्ये घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी राहुल गुलाबसिंग जाखड (व्यवसाय जे.बी.सी. कॅपीटल प्रा. ली. चे डायरेक्टर, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ७९७/२०२३ भा.दं.वि कलम ४०६, ४२० सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनांमधील) हितसंबंधांचे संरक्षण कायदा १९९९ चे कलम ३ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि ठाकुर पुढील तपास करीत आहेत.


















