- चोरी करताना नागरिकांनी रंगेहाथ पकडले; साथीदार फरार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- घरासमोर लॉक करून फिर्यादीने त्यांची दुचाकी पार्क केली होती. रात्री ११.४५ च्या सुमारास फिर्यादीच्या शेजारी रहाणाऱ्या व्यक्तीला पेट्रालचा वास आल्याने त्यांनी रूमच्या बाहेर जावून पाहीले. तेव्हा त्यांना फिर्यादीच्या दुचाकीचे पेट्रोल लॉक तुटलेले दिसले. त्यातून पेट्रोल खाली पडत असताना त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पेट्रोलच्या वॉलवर हात लावून तो बंद करून फिर्यादीला बाहेरून लावलेली कडी उघडून जोरात आवाज दिला. फिर्यादीने घराबाहेर पाहीले असता त्यांनी पेट्रोल लॉक तोडणारा व आपल्या खोल्यांना बाहेरून कडया लावणारा इसम हा संडासमध्ये जावून लपलेला आहे, असे इतरांना सांगितले. तेव्हा फिर्यादी व सोबत तिघांनी संडासमध्ये जावून पाहीले असता आरोपी तिथे त्यांना मिळुन आला. त्यांना पाहून आणखी एक सह आरोपी हा पळुन गेला, असे मुख्य आरोपीने पोलिसांना सांगितले, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. १५) रोजी रात्री १०.०० च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर जंबुकर वस्ती, चाकण येथे घडली. फिर्यादी नवानाथ रामनाथ येडे यांनी आरोपी मेहबुब मकबुल नदाफ, सचिन गायकवाड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी ६७८/२०२३ भा.दं.वि कलम ३७९,५११ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच एकाला अटक केली आहे. पो.ना. बिराजदार घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

















