- सरकारी कामास असल्याचे सांगत एकाला लाखांचा गंडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- नो ब्रोकरेज साईडवर फ्लॅट भाडयाने देणे आहे, अशी जाहीरात फिर्यादीने दिली होती. त्यानुसार आरोपी मोबाईल नंबर धारक अनोळखी इसमांनी फ्लॅट भाड्याने घेणे असल्याचे फिर्यादीला सांगितले. फिर्यादी यांना सरकारी कामास असल्याचे सांगुन सरकारी प्रोसेस असल्याचे सांगत फिर्यादी यांचा विश्वास संपादन करीत ९,०७,२४९ रुपये पाठविण्याची मागणी केली. आरोपींनी पैसे घेऊन फिर्यादीची ऑनलाईन फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
फसवणुकीचा हा प्रकार (दि.०९/०७/२०२३ ते दि.११/०७/२०२३) रोजी संत तुकारामनगर पिपरी येथे फिर्यादीच्या राहत्या घरी घडला. फिर्यादी प्रविण सिंग पनवार यांनी आरोपी ९१२४२१८९७६, ९३९४६८२३०७ या मोबाईलधारक अनोळखी इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ८५७/२०२३भा. दं.वि कलम ४२० माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (क), ६६ (ड) नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोनि गुन्हे देवडे पुढील तपास करीत आहेत.


















