- सहा जणांच्या टोळीकडून गुंतवणूकदाराचे छत्तीस लाख घेऊन पोबारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- Vedic ayurcure Health And Retails Pvt Ltd. AXIS E-CORP SOLUTIONS PRIVATE LIMITED व AYURCURE DIRECT PVT. LTD. या कंपनीच्या डायरेक्टरसह आरोपी सहा जणांनी सुपरमार्केट व मिनीसुपर मार्केट टाकण्यासाठी अनुक्रमे २५ लाख व ११ लाख रुपयांचे प्लॅन फिर्यादीला सांगितले.
प्लॅनमध्ये ऑनलाईन नेट बॅकींगने गुंतवणुक करण्यास भाग पाडुन अनुक्रमे ३५ महिने प्रति महिना १ लाख रुपये व ३० महिने ६० हजार रुपये तसेच विक्रीचे ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एकुण ३६ लाख रुपये गुंतवणुक करण्यास फिर्यादीला आरोपी सर्वांनी संगणमताने भाग पाडले. आजतागायत गुंतवणुक केलेले ३६ लाख रुपये व त्यावरील परतावा न देता फिर्यादीची आरोपींनी आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना ऑक्टोबर २०२१ पासुन ते एप्रिल २०२२ दरम्यान येथील फिर्यादीच्या राहत्या घराजवळ घडली. फिर्यादी दिपक भानुदास घोरपडे यांनी आरोपी मुकेश कुमार त्यागी, मोहम्मद फैजान खान, महिला आरोपी, सचिन रामचंद्र सुर्यवंशी, संतोष राजाराम पवार, अनिल काशीराम जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ४२७/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोनि (गुन्हे) तांबे हे पुढील तपास करीत आहेत.

















