- पिंपरीतील डी वाय पाटील हॉस्पीटलच्या मेन गेटवरील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- पिंपरीतील डॉ. डी वाय. पाटील हॉस्पीटलच्या मेन गेटवर (दि. १६) रोजी १०.३० च्या सुमारास फिर्यादी हे सरकारी गणवेशात वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन हे करीत होते. दरम्यान तिथे ऑडी गाडी गेटवर आली. गाडीतील आरोपी महिलेने ‘इनका हर रोज का नाटक है, हम लोग कौन है इनको मालुम नहीं है, तुम एक चौकीदार हो’ असे म्हणून गाडीतून खाली उतरली व ‘आज मैं इसको दिखा देती हूँ की मैं कौन हु और में क्या कर सकती हू अभी दिखा देती हुँ’ असे बोलत तिने फिर्यादीच्या तीनवेळा कानाखाली मारल्या.
तसेच में और भी क्या कर सकती हु बाद में दिखा दूंगी, अशी धमकी देउन गाडीत बसुन गेटच्या आतमध्ये गाडी घेउन निघुन गेली. फिर्यादी हे शासकीय काम करीत असताना त्या कामात प्रतिबंध करुन त्यांना हाताने मारहाण करुन फिर्यादीला काम करण्यापासून परावृत्त केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी सुरक्षा रक्षक अतुल महादेव भांगीरे मसुब यांनी महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ८६०/२०२३भा. दं.वि कलम ३५३,३२३, ५०६ अन्वये महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि चाटे पुढील तपास करीत आहेत.















