- किवळेतील प्रकार; चौघांच्या विरोधात एकाची पोलिसात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- समृध्दी होम्स भागीदार संस्थेच्या आरोपी तिघांनी फिर्यादी यांना १ गुंठा जागा ही १२,५०,००० रुपयांस विकत दिली होती. ही जागा फिर्यादी यांना खरेदीखत दस्त क्रं.६३६७/२०२१ अन्वये व सातबारा उतारा नोंद करून दिली. परंतु त्यांच्या नावे असलेली जागा ही आरोपींनी परस्पर चौथ्या सहआरोपीस विकली. तसेच चौथ्या सह आरोपीने देखील ही जागा ही फिर्यादी यांच्या नावावर आहे, हे माहीत असताना देखील आपसात संगनमत करुन फिर्यादीची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २७/०३/२०१९) रोजी किवळेगाव येथील गट नं ३४ मधील हिस्सा नं. २अ / २ येथे घडली. फिर्यादी उल्हास शंकर शिंदे यांनी आरोपी सुधीर विष्णु वाडेकर, स्वप्निल रामदास भेगडे, हेंमंत सुभाष राउत, हानीफ चकोली यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी ४५९/२०२३ भा.दं.वि कलम ४०६, ४२० नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि बिटे तपास करीत आहेत.















