- दहा लाख रुपये लाटले; तळेगाव दाभाडे पोलिसात महिलेची धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- पोलीस खात्यामधे तिघांनी फिर्यादीच्या पतीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी व फिर्यादीचे पती यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या राहत्या घरी फिर्यादीच्या मैत्रिणीच्या समक्ष एकदा ५००,००० रुपये व दुसऱ्यांदा ५००,००० रुपये रोख स्वरुपात घेतले. असे एकुण मिळुन १०,००००० रुपये घेऊन नोकरी न लावता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३/१२/२०२२) तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे येथे घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी संतोष बाबासो कदम, सनद संतोष कदम, संकेत संतोष कदम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी ४४७/२०२३ भा.दं.वि कलम ४२०, ३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुल्ला पुढील तपास करीत आहेत.