न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- बेकायदेशीररीत्या विक्रीकरीता १३७५ रुपये किमतीचा ५५ ग्रॅम वजनाचा गांजा, ४५.६७५ रुपये किमतीचे MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP इंजेक्शनच्या १४५ पॅकबंद बाटल्या बॉडी बिल्डिंग व नशेसाठी स्वतःजवळ बाळगल्या.
आरोपी दोघांनी एकुण रोख ४००० रुपये व आरोपीच्या ताब्यातील ३०,००० रुपये होंडा कंपनीची ग्रे रंगाची डिओ, दुसऱ्या आरोपीच्या ताब्यात ४०,००० किंमतीची व दुसऱ्या आरोपीकडे बजाज कंपनीची ब्ल्यु अॅव्हेंजर दुचाकी, ३०० चा सुरा असा एकुण १,२१,३५० रुप्यांचा माल जवळ बाळगला.
शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी (दि. १६) रोजी ९.३० च्या सुमारास शिरगाव येथील अभिमान सोसायटीसमोर रोडच्या बाजुला कारवाई करून सुमित गणेश पिल्ले, चैतन्य उमेश कु-हाडे यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे ओषध विक्री परवाना नसताना, त्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, सदर औषध केमिकल असून, डॉक्टरांचे सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्याचे दुष्परिणाम होवुन, औषध घेणा-या व्यक्तीचा मृत्यु किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहित असतांनासुध्दा हे कृत्य केले.
शिरगाव पोलिसांनी २४१ / २०२३ भादवि कलम २७६,३३६,३२८, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब) (ii) (ब) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोनी श्रीमती धुमाळ तपास करीत आहेत.


















