न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- शिरगावात शेतीच्या बाजुला पवना नदीकाठी झाडा-झुडपांमध्ये (दि. १७) रोजी दुपारी १.१० च्या सुमारास महिला आरोपीने गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी अंदाजे १२,००० लिटर मापाचे लोंखडी इम, त्यामध्ये अंदाजे १०,००० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन, गुळाच्या १० किलो वजनाच्या एकूण ३० ठेपा असा ७.१५,००० रुपये किंमतीचा प्रोव्हिबिशन मालाची अनाधिकाराने बेकायदेशिररित्या साठवणुक केली.
पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी कारवाई करताच आरोपीने पलायन केले. पोलिसांनी तीचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही.
शिरगाव पोलिसांनी आरोपी महिलेवर २४३ / २०२३ महाराष्ट्र दारुबंदी अधि कलम ६५ (क), (फ), (ई) नुसार गुन्हा दाखल केला असून मुद्देमाल जप्त केला आहे. पो को परदेशी पुढील तपास करीत आहेत.















