न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- द हॅपी फिट प्री स्कूल तर्फे यमुना नगर निगडी येथे ७६ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. मुलांनी यावेळी ट्राय कलर मध्ये तिरंगी पेहराव केला होता. शाळेच्या प्रिन्सिपल सौ पूजा प्रशांत शिर्के यांनी झेंडावंदन करून मुलांना आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे थोडक्यात समजावले.
तसेच, मुलांना नॅशनल सिम्बॉल्स समजावण्यात आले. स्वतंत्रता दिनानिमित्त ज्युनिअर केजीच्या मुलांनी “आओ बच्चो “या गाण्यावरती नृत्य सादर केले आणि सिनियर केजी च्या मुलांनी “वंदे मातरम” हे राष्ट्रगीत गायले. झेंडावंदनाच्या या कार्यक्रमाला शाळेतला सगळा स्टाफ आणि सगळी मुले हजर होती. मुलांचे पालक देखील उपस्थित होते.















