न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२३) :- संगनमताने आरोपींनी फिर्यादीच्या भंगार खरेदी करणा-या कामगारांना रस्त्यात अडवले. त्यांना फिर्यादीला आरोपीने फोन करुन बोलविण्यास सांगितले. फिर्यादीकडे भंगार धंदा चालवण्यासाठी प्रत्येक इसमांमागे १,००० रुपये मागितले. ती न दिल्याने फिर्यादीला आरोपींनी हाताने मारहाण केली.
जबरदस्तीने फिर्यादीच्या मोबाईलमधील गुगल पे अॅप वरुन आरोपीच्या खात्यात चार कामगार प्रमाणे चार हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. हा प्रकार (दि. १८) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास विमल गार्डनकडे जाणा-या रस्त्यावर, कोकणे चौपाटी, रहाटणी येथे घडला.
फिर्यादी मो. रऊफ रहेमतुल्ला खान (रा. तांबे चौक, रहाटणी) यांनी निलेश पाटील, गणेश गुटाळ, गणेश गर्दे (रा. रहाटणी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ८०८ / २०२३ भा.द.वि. कलम ३४१, ३९४, ३८४,३४ नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.


















