न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२३) :- दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या हद्दीत (दि. १८/०७/२०२३) रोजी तीन च्या सुमारास देहू फाटा चौक येथे पोलीस हवालदार गरजे हे वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी एक्टिवा दुचाकी विदाऊट नंबर प्लेट त्यांना दिसल्याने त्यांनी सदर गाडी बाजूला घेतली. गाडीच्या नंबरबाबत तसेच लायसन्स, पेपर्सबाबत विचारणा केली असता तो पेपर घेऊन येतो म्हणून आरोपी निघून गेला. तो परत आला नाही.
पो. हवा. गर्जे यांनी सदरची गाडी दिघी आळंदी वाहतूक विभाग येथे आणून लावली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजीव रणदिवे यांनी गाडीचा चासिस नंबर व इंजिन नंबरवरून गाडी मालकाचा नाव, पत्ताबाबत माहिती काढली. सदरच्या गाडी संदर्भात राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २४२/२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती मिळाली.
तपासी अंमलदार पोलीस नाईक कोंढाळकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना गाडीबाबत माहिती दिली. दरम्यान (दि. १६) रोजी पोलीस हवालदार कोंढाळकर हे दिघी आळंदी वाहतूक विभाग येथे आल्याने त्यांच्या ताब्यात ही एक्टिवा दुचाकी पुढील कारवाईसाठी दिली आहे.


















