न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२३) :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने “दिव्यांग कल्याण दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रम मंगळवारी (दि. २२) सकाळी दहाला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे.
दिव्यांग नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणा एकाचा ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगाच्या तक्रारी जाणून घेऊन त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चिंचवड येथील प्रा. मोरे प्रेक्षागृहात घेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी विविध विभागाचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास दिव्यांग विभागाचे अध्यक्ष बच्चू कडू तसेच, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पिंपरी- चिंचवड व पुणे महापालिका तसेच, विभागीय कार्यालयाकडे जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.















