- आठ महिन्यात तब्बल ५३ सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी दाखविला बाहेरचा रस्ता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२३) :-पिपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ मधील पोलीस स्टेशनच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी असे गुन्हे करणा-या टोळी प्रमुखांसह त्यांच्या साथीदारांवर अनेकदा अटकेची कारवाई केली जाते. तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहत असल्याने या टोळ्यांतील गुन्हेगारांवर हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.
परिमंडळ हद्दीतील भोसरी एमआयडीसी भोसरी, चिंचवड, निगडी, पिंपरी, दिघी, आळंदी, चाकण, एमआयडीसी महाळुंगे या पोलीस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या तडीपार प्रस्तावांची चौकशी केल्यानंतर जानेवारीपासून आजपर्यंत एकूण ५३ सराईत गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद व पुणे ग्रामीण हदीतून (पुणे जिल्हा) दोन वर्षांचा तडीपार आदेश (दि. १६ ते दि. १८) रोजी ०२ दिवसातच भोसरी पोलीस स्टेशन अंतर्गत टोळीतील १३ सराईत गुन्हेगार टोळ्यांवर पोलीस उपायुक्त परिमंडळ १ चे विवेक पाटील यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली काढले आहेत.
टोळी क्रमांक १ चा टोळी प्रमुख मुसा उर्फ मुसीफ वजिर थोरपे (वय २१ वर्ष, रा. नुर मोहल्ला गल्ली, दिघी रोड, भोसरी), टोळी सदस्य किरण उर्फ किक्या सुरेश डोळस (वय २४ वर्षे, रा. क्रांती सूर्यानगर, दिघी रोड, भोसरी), रुषीकेश उर्फ बंटी संतोष इंगळे (वय २३ वर्षे, रा. गवांडे यांचे खोलीत राधेकृष्ण कॉलनी न. ३, चक्रपाणी वसाहत, भोसरी)
टोळी क्रमांक २ चा टोळी प्रमुख सागर दिपक वाल्मिकी (वय २० वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, दापोडी), टोळी सदस्य सेफ अली अहमद रेन (वय २२ वर्षे, रा. एस. एम. एस. कॉलनी बॉर्ड नंबर ४, दापोडी), ओमकार निळकंठ गायकवाड (वय २३ वर्षे, रा. सिध्दार्थनगर, दापोडी), चार्लस उर्फ बॉबी शेखर पिल्ले (२० वर्षे, रा. नालंदा बुद्धविहार समोर पवार वस्ती, दापोडी), ऋतीक कोंडिबा जावीर (वय २२ वर्षे, रा. पवार वस्ती, दापोडी), प्रणव उर्फ सोन्या विनोद कांबळे (वय २० वर्षे, रा. पवार वस्ती, दापोडी), संकेत उर्फ महादया गणेश पवार (वय २० वर्षे, रा. शिवशक्ती तरुण मंडळ जवळ बोर्ड दापोडी), राहुल उर्फ चिक्या शाम साळवे (वय २२ वर्ष, रा. सुदाम काटे चाळ, नेहरू चौक, दापोडी), अक्षय उर्फ जंगल्या राजु भालेराव (वय २६ वर्षे, रा. महादेव आळी, दापोडी गावठाण), राम अशोक कांबळे (वय २१ वर्ष, रा. प्रकाश वाडेकर यांच्या घरासमोर सिध्दार्थ नगर, दापोडी) यांना पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हदीतून दोन वर्षे तडीपार केलेले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ०१) चे विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभागाचे सतिश कसबे, भास्कर जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस स्टेशन सपोनि कल्याण घाडगे, पोउपनि अशोक दांगट, पोलीस अमलदार राजेंद्र राठोड, वसंत दळवी, वैभव येरंडे, नुतन कोंडे, सुकन्या घोलप यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.















